---Advertisement---

नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना गंडा, PM किसान योजनेच्या नावाखाली अशी होतेय फसवणूक?..

scam farmer link
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२५ । ऑनलाईन सायबर ठगांकडून विविध फंडे वापरून नागरिकांना गंडा घातला जात असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अशातच सायबर भामट्यांकडून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. एकीकडे शेतकर्‍यांना PM किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा असताना, या योजनेच्या नावावर बनावट लिंक पाठवून त्यांची फसवणूक करण्यात येत आहे. ही लिंक उघडताच शेतकर्‍यांच्या मोबाईल फोन हॅक करून बँक खात्यातून पैसे काढून घेतले जात आहेत.

कशी होतेय फसवणूक?
शेतकर्‍यांना मोबाईलवर PM किसान योजनेसंदर्भात लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर, मोबाईलमध्ये एक विशिष्ट एपीके फाईल डाऊनलोड होते, ज्यामुळे मोबाईल हॅक होतो. हॅकर्स टप्प्याटप्प्याने बँक खात्यातील रक्कम काढून घेतात. नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

सावध राहण्याची गरज
शेतकर्‍यांना या योजनेचा 19 वा हप्ता मिळणार की नाही, हे तपासण्यासाठी अधिकृत साईट pmkisan.gov.in ला भेट द्यावी. ‘Know Your Status’ वर क्लिक करून नोंदणीकृत क्रमांक टाकून तपासावे. मोबाईलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, विशेषत: जर त्यात एपीके फाईल डाऊनलोड करण्याचा संदेश असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे.

पोलिसांकडे तक्रार
फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी नाशिक पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि शेतकर्‍यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---