---Advertisement---

Nashik : लासलगाव बाजार समितीत कांदा दरात मोठी घसरण ; पहा किती मिळतोय भाव?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२५ । तब्बल ५ दिवसांच्या सुट्टीनंतर नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत आजपासून कांदा लिलाव सुरू झाला आहे. मात्र आज कांद्याच्या दरात घसरण दिसून आली. आवक वाढल्याने कांद्याच्या दरात सरासरी तब्बल २०० रुपयांची घसरण झाली.

कांदा निर्यातीवरील निर्बंध हटवल्यानंतर कांद्याचे दर वाढण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र यानंतर देखील कांद्याचे दर घसरलेलेच दिसत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

५ दिवसांपूर्वी २७ मार्चला लासलगाव बाजारसमितीत कांद्याला मिळाला होता सरासरी १४५० रुपयांचा भाव होता. मात्र आज बुधवारी लिलावाला सुरुवात झाल्यानंतर कांद्याला कमीत कमी ७०० तर जास्तीत जास्त १६०२ आणि सरासरी १२५० रुपयांचा भाव मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---