नाशिक लाईव्ह न्यूज । यंदा समाधानकारक पावसामुळे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापासून राज्यात आगाप रब्बी उन्हाळ कांद्याच्या ठिकाणी लागवडी सुरू झाल्या. आता या कांद्याची काढणी सुरू झाल्याने बाजारात नवीन कांद्याची आवक टप्प्याटप्प्याने वाढत आहे. नाशिकच्या देवळा येथे सर्वाधिक आवक झालेल्या उन्हाळ कांद्याला कमीत कमी ७०० तर सरासरी २२०० रुपयांचा दर मिळाला.
राज्यात आज गुरुवार (दि.०६) रोजी एकूण ६९,८९१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२९७५ क्विंटल लाल, २१४१० क्विंटल लोकल, १२३५० क्विंटल पोळ, २६६५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या येवला बाजारात कमीत कमी व सरासरी असा दर मिळाला. तर सिन्नर-नायगाव येथे २१००, मनमाड येथे २१००, भुसावळ येथे २२०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.
पिंपळगाव बसवंत येथे आवक पोळ कांद्याला आज कमीत कमी ६०० तर सरासरी २१५० रुपयांचा दर मिळाला. तसेच लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी १३०० तर सरासरी १९०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच सांगली -फळे भाजीपाला येथे १८५०, पुणे-पिंपरी येथे १४००, पुणे-मोशी येथे १७५० रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला.