---Advertisement---

निफाडच्या भूमी अभिलेखच्या शिपाईला साडेतीन लाखाची लाच घेताना अटक

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकच्या निफाड येथून लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. भूमी अभिलेखच्या शिपाईला साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. नितेंद्र काशिनाथ गाढे (35) असे अटक केलेल्या उपअधीक्षक भूमी अभिलेख निफाड येथील शिपायाचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदारांच्या मावशीची दीक्षि (ता.निफाड) येथे शेतजमीन आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे 25 जानेवारी 2025 रोजी अर्ज केला होता. तक्रारदारांनी पाठपुरावा केल्यानंतर सदर जमिनीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून २८ फेब्रुवारी २०२५ रोजी मोजणी करण्यात आली. मात्र, हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या. शिपाई गाढे याने भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक भाबड यांच्या ओळखीचा तक्रारदारावर प्रभाव टाकला.

भाबड यांच्याशी बोलून शुक्रवारी (दि.7) हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात गुरुवारी (दि.6) स्वतःसाठी व भाबड यांच्या नावे चार लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करीत सापळा रचला. तडजोडीअंती गाढे याने तक्रारदाराकडून साडेतीन लाख रुपये लाचेची मागणी करून ती शुक्रवारी (दि.7) स्वीकारली. त्यावेळी पथकाने त्यास लाच घेताना रांगेहाथ पकडले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---