नाशिक लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला. ज्यात मुंबईकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल दरीत कोसळला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.ट्रकचा चालक सौद अहमद अन्सारी (वय २८ रा. मालेगाव) व त्याचा सहकारी अब्दुल मजीद अब्दुल वहाब हे जागीच ठार झाले आहेत.
या घटनेबाबत असे की, नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंटजवळ सिमेंटने भरलेला ट्रक (क्र MH18 BG 9004) हा मुंबईकडे जात असतांना दरीत कोसळला. ही अपघाताची घटना शुक्रवार (दि.21) पहाटेच्या सुमारास घडली. ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक दरीत कोसळून अपघात झाला. याअपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत.
अपघातात ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला असून दरीत पूर्णपणे सिमेंट पसरले आहे. महामार्ग पोलीस केंद्र घोटी व रूट पेट्रोलिंग टीम व कसारा शहापुर येथील आपत्ती टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरु करून त्यांच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह बाहेर कडून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.