नाशिक लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२५ । नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील नाशिक शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचा सख्खा भाऊ प्रशांत जाधव दोघांची कोयत्याने सपासप वार करत हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, चिमुकल्या मुलासमोरच बापाचा जीव घेतला. हत्येचं कारण अद्याप समोर आलेले नाही. रंगपचंपमीच्या दिवशीच जाधव नाशिकमध्ये हत्याची घटना घडली.
नाशिकमधील बोधलेनगरजवळच्या आंबेडकरवाडीमध्ये जाधव यांच्या राहत्या घरासमोर दोघा भावांवर टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. जखमी अवस्थेत दोन्ही भावांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी दोन्ही भावांना मृत घोषित केले. ही बाब उघडकीस येताच जिल्हा सरकारी रुग्णालयात मोठी गर्दी जमली आणि पोलिसांना सुरक्षा वाढवावी लागली. दरम्यान एका लहान मुलांच्या समोर दोन्ही भावांवर टोळक्याने हल्ला केल्याने मुलगा घाबरून पळून गेला.
या दोन्ही भावांवर हल्ला कोणी आणि का केला यामागील खरे कारण उघड झालेले नाही. तथापि, पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी ४ पथके रवाना केली आहेत. होळीनंतर बुधवारी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता, त्यावेळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या बाबत उप नगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,