---Advertisement---

नवी मुंबई महानगरपालिकेत ६२० पदांकरीता जम्बो भरती ; तब्बल एवढा पगार मिळेल?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अंतर्गत भरतीची जाहिरात निघालीय. यामध्ये गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत. एकूण ६२० पदांकरीता ही भरती होईल. Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. या नोकरीसाठी तुम्ही २८ मार्चपासून अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीथ ११ मे २०२५ आहे.

या विभागांमध्ये होईल भरती?
प्रशासकीय, अभियांज्ञिकी, तांत्रिक, वित्त, सार्वजनिक आरोग्य अशा अनेक विभागांमध्ये भरती करण्यात आली आहे.

भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचे नाव :
बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग), उद्यान अधिक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजिनिस्ट, स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.), डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, इसीजी तंत्रज्ञ, सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट), आहार तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा सहाय्यक, औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक (महिला), बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप), शस्त्रक्रियागृह सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, वायरमन, ध्वनीचालक, उद्यान सहाय्यक, लिपीक-टंकलेखक, लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस, कक्षसेविका/आया, कक्षसेवक (वॉर्डबॉय)

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

कोणत्या पदांसाठी भरती अन् पगार किती?
बायोमेडिकल इंजिनियर पदासाठी ४१८०० ते १३२३०० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर सिविल इंजिनियर, ज्युनियर बयोमेडिकल इंजिनियर, उद्यान अक्षिक्षक, माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवर या पदांसाठी ३८६००-१२८०० रुपये पगार मिळणार आहे. डेंटल हायजिनिस्ट पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे. स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, इसीजी तज्ञ, सी.एस.एस.डी तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ या पदासाठी ५४०० ते ११२४०० पगार मिळणार आहे.नेत्र चिकीत्सक सहाय्यक पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे.

परीक्षा शुल्क :
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरायचे आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---