---Advertisement---

नाशिकच्या रस्त्यावर तरुणाचा मुजोरपणा ; महिलेसोबत गैरवर्तन करत शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका रिक्षाचालकांची गुंडगिरी समोर आली होती. भरचौकात रिक्षाचालकाने कारचालकासह त्याच्या कुटुंबाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर आता नाशिक शहराच्या रस्त्यावर तरुणाने मुजोरपणा केल्याचा प्रकार घडला.

तरुणाने एका महिलेसोबत गैरवर्तन करत तिला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पीडित महिलेच्या तक्रारीनंतर या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत भद्रकाली पोलिसांनी त्याला अटक केली. समीर हमीद शहा असं या गैरवर्तन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

सिग्नल सुरू नसताना कारसमोर आल्यानं पीडित महिलेने या तरुणाला सिग्नल बघ असे म्हटले त्यामुळे तरुणाला राग आला. रागाच्या भरात या तरुणाने कारला दुचाकी आडवी लावून भरस्त्यात राडा केला. कारमधील महिलेने जाब विचारल्याने तरुणाने लाथ मारली आणि शिवीगाळ केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा मुजोरी करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---