नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक (Nashik) जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात तापमानाचा (Tempreture) पारा वाढल्याने दिवसाची थंडी (Cold) गायब झाली आहे. किमान तापमानाचा पारा १५ अंशावर गेल्याने थंडी जाणवत नसून तर कमाल तापमान ३३ अंशापर्यंत गेल्याने दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. यातच राज्यात पुढचे काही दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून यादरम्यान कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, तर किमान तापमान 14 ते 19 अंशांच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. Nashik Weather Update Today
नाशिकमध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश आहे. आज नाशकातील कमाल तापमान 33 ते 34अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. रात्री आणि पहाटच्या सुमारास थंडी जाणवत आहे. मात्र दुपारनंतर उन्हाचा चटका बसत असून अंगातून घामाच्या धारा वाहत आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील या बदलांमुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
उष्णतेच्या या लाटेचा विचार करून शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांना आवश्यक पाणी देऊन संरक्षण करावे. जनावरांसाठी सावलीची व्यवस्था करावी आणि त्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. उष्णतेमुळे जनावरांमध्ये उष्माघात आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो. त्यामुळे पशुपालकांनी विशेष काळजी घ्यावी.
दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे. बाहेर पडण्याची गरज असल्यास हलके, सैलसर कपडे परिधान करावेत आणि उन्हापासून संरक्षणासाठी टोपी, गॉगल्स आणि छत्रीचा वापर करावा. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी आणि फळांचे रस पिण्यास प्राधान्य द्यावे. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांनी विशेष दक्षता बाळगावी कारण या लोकांना उष्णतेचा अधिक परिणाम होऊ शकतो.