नाशिक लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२५ । महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या हवामानात (weather) मोठे बदल होत असून, तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. नाशिकसह राज्यातील काही भागांत वातावरणात लक्षणीय बदल झाले आहेत. रात्रीच्या वेळेस आणि पहाटेच्या दरम्यान थंडी जाणवते, तर दिवसा प्रचंड उकाडा नागरिकांना सहन करावं लागत आहे. दरम्यान राज्यात आजपासून तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून दुपारनंतर ठराविक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. Nashik Weather Today
आज कसं असेल नाशिकमध्ये तापमान?
नाशिकमध्ये दोन दिवसापूर्वी कमाल तापमानाचा पारा ३७ अंशावर गेला होता. आज मंगळवारी त्यात घसरण होऊन तो ३४.३ अंशावर होता. तर किमान तापमान १४. ४ अंशावर होते. दरम्यान आज नाशिकमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये आज सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत नाशिकमधील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फेब्रुवारीच्या सुरुवातीला नाशिकमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.