नाशिक लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । नाशिक शहरवासीयांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे उद्या शनिवारी (दि.१२) हनुमान जयंतीनिमित्ताने शहरातील पंचवटी, जुने नाशिक परिसरातून मिरवणूक काढली जाणार असून यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून याबाबतची अधिसूचना वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काढली आहे.
वाहतुकीसाठी हे मार्ग बंद
मिरवणूक मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा मार्गांवरील वाहतुकीस बंदी असेल.
हातगाड्या, बैलगाड्यांसह सर्व प्रकाराच्या वाहनांना प्रवेश बंद
हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने शनिवारी (दि.१२) दुपारी तीन वाजता चौकमंडईतील वझरे मारुती मंदिरापासून मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्गावर वाहतुकीला बंदी असणार आहे. मिरवणूक वझरे मारुती मंदिर (चौकमंडई) येथून निघणार असून दूधबाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, एमजी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रामतीर्थ (पंचवटी) असा मिरवणुकीचा मार्ग आहे.
पर्यायी मार्ग असे…
वाहने बागवान पुरा पोलिस चौक ते अमरधाम रोड ते पंचवटी ये-जा करू शकतील.
सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल, मोडक सिग्नल, शालिमार, सीबीएस, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाकामार्गे चोपडा लॉन्स, पंचवटीकडे वाहतूक वळवली आहे.
पंचवटी कारंजाकडून येणारी वाहतूक मखमलाबाद नाका, चोपडा लॉन्स, जुगा गंगापूर नाकाकडे ये-जा करू शकेल.
सीबीएसकडून पंचवटीकडे जाणारी वाहतूक मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, गुरांचा दवाखाना, घारपुरे घाट, रामवाडी पुलावरून मखमलाबाद नाका मार्गे पंचवटीकडे येतील-जातील.