---Advertisement---

नाशिकचा ठाकरे गटाचा नेता मुख्यमंत्र्याच्या भेटीला, मंत्री महाजन म्हणाले आठ दिवसात भूकंप होणार..

uddhav thakre
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन साडेतीन महिन्यात होणार असून त्यापार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागलेत. मात्र यातच ठाकरे गटाला आणखी एक मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असताना त्यांची ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर भेट घेतली. या भेटीवरून भाजप नेते गिरीश महाजन ठाकरे गटाला चिमटा काढलाय. येत्या ८ दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार आहे, या भूकंपाच्या धक्क्यात ठाकरे गट जमीनदोस्त होणार असल्याचं भाकित गिरीश महाजन यांनी केलंय.

महापालिका निवडणुका तोंडाशी आल्या आहेत, अशात राजकीय पक्ष डावपेच आखू लागलेत.यातच ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. बडगुजर हे लवकर ठाकरे गटाला रामराम करणार असल्याच संकेत गिरीश महाजन यांनी दिलेत. येत्या काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवलीय.

महापालिका निवडणुकीआधी शिंदे गट आणि भाजप ठाकरे गटाची ताकद कमी करू पाहत आहे. मुंबई महानगरपालिकेतील जवळपास ५० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यानंतर या निवडणुका तोंडावर आल्या असताना नाशिकमध्ये भाजप ठाकरे गटाला धक्के देण्याच्या तयारीत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कोण राहतो आणि कोण कोण पक्ष सोडतो, हे पुढच्या आठ दिवसांत समजेल, असे भाजप नेते गिरीश महाजन म्हणालेत. त्यामुळे बडगुजर यांनी फडणवीसांच्या घेतलेल्या भेटीची जोरदार चर्चा सुरू झालीय. संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान बडगुजर यांनी फडणवीस यांच्या भेटीवर आपली प्रतिक्रिया देत सर्व राजकीय चर्चांना फेटाळून लावल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---