---Advertisement---

नाशिककरांनो काळजी घ्या! उन्हाच्या झळा वाढल्या, दोन दिवसात तापमानात मोठी वाढ, आता पुढे काय?..

tapman
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२५ । मार्चच्या सुरुवातीपासून राज्यात तापमानाचा पारा वाढू लागला असून आता काही ठिकाणी तापमानाने ३७-३८ अंशापर्यंत मजल मारली. यामुळे प्रचंड उन्हाचा तडाका वाढत चालल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. नाशिकमधील देखील तापमानाचा पारा वाढला असून भाजून काढणाऱ्या उन्हाच्या झळा नाशिककरांनी शनिवारी दुपारी अनुभवल्या.

नाशिकचे शनिवारी (दि. ८) कमाल तापमानाचा पारा अचानकपणे ३६.७ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन भिडला. नाशिक शहर व परिसरात गुरुवारी (दि ६ मार्च) अचानकपणे किमान तापमानात ७ अंशांनी घट होऊन पारा दहा अंशांपर्यंत स्थिरावला होता. यामुळे नाशिककरांना रात्री व पहाटेसुद्धा थंडीची तीव्रता अनुभवयास आली होती.

दोन दिवस उलटत नाही, तोच कमाल तापमानाने अचानकपणे उसळी घेतली ३३ अंशांवरून तापमान थेट ३६.७ अंशांपर्यंत पोहोचले. यामुळे नागरिकांना कमालीचा उष्मा जाणवला. गुरुवारी (दि. ६) कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. दरम्यान आगामी काही दिवसात तापमान ४० अंशापर्यंत जाणार असून पुढील दोन दिवसात नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

अशी घ्या खबरदारी
तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तास फरकाने पाणी प्यावे.
घराबाहेर पडताना छत्री अथवा २ टोपी, स्कार्फचा वापर करावा.
दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी • पडदे आणि झडपांचा वापर करा.
हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावे.
प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ६ ठेवावे.
उन्हात काम करताना टोपी, छत्री ७ किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---