---Advertisement---

Nashik Temperature : नाशिकमध्ये उन्हाचा चटका वाढला ; आज कसं राहणार तापमान? वाचा..

tapman
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२५ । राज्याच्या हवामान मोठे बदल पाहायला मिळत असून फेब्रुवारीपासूनच थंडी गायब होऊन उन्हाचा चटका वाढला आहे. नाशिकसह अनेक जिल्ह्यांतील तापमानाचा पारा ३५ अंशावर गेला आहे. यामुळे फेब्रुवारीत उन्हाचा चटका वाढल्याने उकाडाही जाणत आहे. दरम्यान,नाशिकमध्ये पुढील दोन दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर तापमानात वाढ होणार आहे. Nashik Temperature Update

शुक्रवारी नाशिकमध्ये कमाल तापमान ३५.६ अंश तर किमान तापमान ११.४ अंश इतके होते. तर आज नाशिकमध्ये २२ फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नाशिकमधील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पुढील दोन दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून यांनतर तापमानात वाढ होणार आहे.

राज्यातील या ठिकाणी पावसाचा अंदाज?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, इशान्य भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचाच परिणाम दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तुरळक भागात जाणवणार असून हलक्या पावसाची शक्यता या दोन भागांना देण्यात आलीय. 23 आणि 24 फेब्रुवारीला दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावतील असं प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितलंय.उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे व शुष्क राहणार असून येत्या 2 दिवसात हळूहळू तापमानवाढ होणार असल्याचं सांगण्यात आलंय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---