---Advertisement---

नाशिकमध्ये उष्णतेचा कडाका वाढू लागला ; आज असं राहणार तापमान?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकसह राज्यात तापमानाचा कडाका वाढू लागला आहे. राज्यातील सर्व प्रमुख शहरातील तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे तर किमान तापमानामध्ये देखील वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळी जाणवणारी हलकीशी थंडी देखील गायब झाल्याचे चित्र असून त्याची जागा आता उष्णतेने घेतली आहे.

मंगळवारी नाशिकचे कमाल तापमान ३५.८ अंश तर किमान तापमान १७.९ अंशापर्यंत पोहोचले. दरम्यान आज नाशिकमध्ये निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस किमान तापमान १७ अंश सेल्सिअस एवढे असेल. तापमानात वाढ होऊ लागल्याने सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत असून यामळे नाशिककर हैराण झाला.

राज्यात काय स्थिती?
महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढताना दिसत असून यातच आगामी काही दिवसात तापमानात ३ ते ४ अंशानी वाढण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पुढील दोन-तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---