---Advertisement---

नाशिकच्या निफाड येथे नीचांकी तापमानाची नोंद

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२५ । राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. कमाल तापमानाचा पारा वाढल्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा अधिक जाणवत आहेत आणि उकाडाही वाढलेला आहे. मात्र, उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात काहीशी घट झाली. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ८ अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली.

तर शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर आणि रत्नागिरी येथे ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, जी राज्यातील सर्वाधिक होती. आज राज्यात उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता असून, कोकणातील उष्ण व दमट हवामानामुळे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.तसेच, उर्वरित महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नाशिक तापमान?
उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात बरीच वाढ बघायला मिळाली होती. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमधील तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. शुक्रवारी नाशिक शहराचे किमान तापमान 12.4 तर कमाल तापमान 34.9 अंश सेल्सिअस इतके होते. दरम्यान आता त्यात बहुतांश वाढ होऊन नाशिकमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील काही दिवसांत नाशिकमधील तापमानात वाढ होऊन ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---