---Advertisement---

नाशिकमध्ये उन्हाचा चटका वाढला ; २ एप्रिलपर्यंत असं राहणार वातावरण?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । मार्च महिन्याच्या शेवटी नाशिकसह राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. एप्रिल मे महिन्यात जाणवणारे तापमान मार्च महिन्यातच जाणवत असल्याने उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. दरम्यान नाशिकमध्ये बुधवारी किमान १९.६ तर तापमान ३७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

मार्च महिन्यात नाशिकमध्ये हवामान कोरडे राहिल्याने २६ दिवसांपैकी २३ दिवस कमाल तापमान हे ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिले आहे. अर्थात हा संपूर्ण महिना प्रचंड उकाड्याचा गेला. दोन दिवसांपासून किमान तापमानात देखील वाढ होत आहे. बुधवारी किमान १९.६ तर कमाल ३७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

त्यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. तसेच आगामी २ एप्रिलपर्यंत वातावरण संमिश्र राहणार असून कमाल तापमान हे सरासरीइतके राहण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---