---Advertisement---

नाशिकमध्ये मार्चच्या प्रारंभीच तापमान चाळीशीकडे ; उन्हापासून अशी घ्या काळजी?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२५ । थंड हवेचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये मार्चच्या प्रारंभीच तापमानाचा पारा चाळीशीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रविवारी दिवासाचे तापमान ३७ अंशापर्यंत पोहोचले असून कमाल तापमानातील वाढीने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. येत्या काही दिवसात तापमान ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या राज्यभरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले असून यामुळे वाढते तापमाना आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. अशामध्ये येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

नाशिकमध्येही तापमान सतत वाढत असून, उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी तापमानात काहीशी घसरण झाली होती. निफाडमध्ये पारा तब्बल ४.२ अंशांपर्यंत खाली गेल्याने, दिवसा तीव्र उन्हाचा त्रास आणि पहाटे गारवा असे विरोधाभासी हवामान अनुभवायला मिळाले.सध्या तापमान पुन्हा वाढत असल्याने, दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते ओस पडत आहेत. उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होत असल्याने, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

उन्हापासून अशी घ्या काळजी
स्वत:ला हायड्रेटेड ठेवावे.
किमान दोन लिटर पाणी प्यावे.
नारळपाणी, लिंबूपाणी, ज्यूस यांचे सेवन करावे.
घराबाहेर जाताना टोपी, ओढणी, रुमाल वापरावे.
गडद रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे.
हलके, सैल आरामदायी कपडे परिधान करावे.
पचायला हलके पदार्थ खावे, सनस्क्रीन लावावे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---