---Advertisement---

घराचं स्वप्न आणखी महागलं; नाशिकमध्ये आजपासून घर खरेदी विक्रीच्या दरात वाढ

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । नाशिककरांचे घर घेण्याचे स्वप्न आणखी महागणार आहे, कारण खरेदी विक्रीच्या दरात सरकारकडून वाढ कऱण्यात आली आहे. राज्यातील रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिकमध्ये ७.३१ टक्के दर वाढवण्यात आली असून यामुळे घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखी महागणार आहे.

कोरोनामुळे एक एप्रिल 2020 ऐवजी सप्टेंबर 2020 मध्ये रेडी रेकनर दरात वाढ करण्यात आली होती.त्यानंतर 2021-22 या आर्थिक वर्षात रेडीरेकनरचे दर जैसे थे ठेवण्यात आले होते. मात्र, यंदा ७.३१ टक्के दरवाढ नाशिक महापालिका क्षेत्रात तर मालेगाव येथे ४.८८ टक्के इतकी सरकारी वाढ करण्यात आली आहे. रेडीरेकनरवर मुद्रांक शुल्क, महापालिकेचे बांधकाम विकास शुल्क आणि प्रीमियम एफएसआय असल्याने घरांच्या दरात वाढ होणार आहे.

राज्य शासनाच्या वतीने १ एप्रिलपासून दरवर्षी रेडीरेनकरचे नवीन दर जाहीर होतात. त्यानुसार विकासकांना येणारा खर्च लक्षात घेऊन घरांच्या किमती ठरत असतात. नाशिकमध्ये रेडीरेकनरच्या सरासरी ७.३१ टक्के वाढ झाली आहे. अर्थात असे असले तरी गेल्या काही वर्षात या रेडीरेकनरच्या पुस्तिकेतील तळटीपा व्यावसायिकांना अडचणीच्या ठरतात. त्यामुळे दर तूर्तास कमी वाटत असले तरी या दरवाढीमुळे खरा परिणाम काय होणार हे तळटीपा पाहूनच कळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---