---Advertisement---

राहुड घाटात 7 ते 8 वाहनांचा विचित्र अपघात ; एका महिलेचा मृत्यू, अनेक जखमी

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२५ । राज्यासह नाशिक (Nashik) जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच नाशिक-चांदवडच्या राहुड घाटात (Rahud Ghat) शुक्रवारी रात्री 7 ते 8 वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आलीय. ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून 20 हुन अधिक जण जखमी झाले आहे . एका वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड- मालेगाव दरम्यान राहुड घाट आहे. घाट उतरताना एका भरधाव मालट्रकचा ब्रेक फेल झाला. ट्रकने पुढे असलेल्या अनेक वाहनांना ठोकले यात अन्य वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात मालेगाव येथील उषा देवरे (४६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींना मालेगाव व इतरत्र खासगी रूग्णालयात नेण्यात आले. दरम्यान अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

अपघातामुळे महामार्गावरील एका बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. घाटातील उतारावर मालमोटारीचा ब्रेक निकामी होऊन हा अपघात झाल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त होत आहे. इको व स्विफ्ट मोटारीसह मालवाहू वाहनाचे मोठे नुकसान झाले.

दिवसभरात दोनवेळा अपघात
दरम्यान, घाटात अपघाताची मालिका सुरुच असून दिवसभरात राहुड घाटामध्ये दोनवेळा अपघात घडले आहे. यापूर्वी सायंकाळच्या सुमारास तीन वाहनांचा घाटात अपघात झाला होता. त्यानंतर हा पुन्हा मोठा अपघात आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---