नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच पाथर्डी गाव ते नाशिकरोड ही सिटी लिंक बससेवा सेवा नियमित सुरू केली आहे. या सेवेसाठी स्थानिक रहिवाश्यांनी आंदोलन केलं होते. या आंदोलनाची सिटी लिंक व्यवस्थापनाने दखल घेत बस क्र. २०४ द्वारे ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
ही बस सध्या द्वारकामार्गे सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी जल्लोष करत ही सेवा नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. या बससेवेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्याथ्यर्थ्यांना होणार आहे. ही सेवा पाथर्डी फाट्यापासून अंर्तगत मागनि द्वारकावरून जाणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. नागरिकांनी बसचालक समाधान चारोस्कर आणि वाहक योगिता भारती यांच्यासह या बससाठी विशेष पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते बंडू दळवी आणि वैशाली दळवी यांचा सत्कार केला.
बसचे वेळापत्रक असे
नाशिकरोड ते पाथर्डी गाव व्हाया द्वारका
सकाळी :०७,५५, ८.५९, १०,०७, १०.३७, ११.३७,
दुपारी : १२.०७, १.३७, २.३७,
सायंकाळी ६.०८, ६.३७, ७.०७,
रात्री ८.०७, ८.३७, ९.०७
पाथर्डी गाव ते नाशिकरोड व्हाया द्वारका
सकाळी ७.३७, ८.११, ८.३७, ९.०९,१०,११, १०.४१, ११.११, ११.४५
दुपारी : १२.११, १.११, ४.४१,
सायंकाळी : ५.४१, ६.११, ६.४९, ७.११, ७.४१,
रात्री : ८.२०