---Advertisement---

आग विझवण्यासाठी नाशिक महापालिका खरेदी करणार ‘इतक्या’ कोटींचा रोबोट

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । जवळपास ६ लाख मिळकर्तीच्या नाशिक शहरात १२० मीटर उंचीपर्यंत गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. यासाठी एकीकडे ९० मीटर उंचीची अग्निप्रतिबंधक शिडी खरेदीसाठी प्रक्रिया सुरू असताना आता अरुंद जागेत जाऊन आग विझवण्यासाठी ६.७५ कोटी खर्च करून रोबोट खरेदी केले जाणार आहे. दुसरीकडे, महसुली खर्च वाढल्यामुळे आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या पुढे जाऊन पालिकेची नोकर भरती अडचणी देणार आहे.

शहराचा झपाट्याने विस्तार होत असून इमारतींची संख्या देखील वाढत आहे दुसरीकडे मात्र महापालिकेला अग्निशामक दलाकडे आवश्यक यंत्रणा नाही. मंजूर आकृतीबंधातील अनेक पदे रिक्त असून अत्यावश्यक भरतीला देखील मान्यता मिळालेली नाही. साधारण दर १२ वर्षांनी कुंभमेळ्यानिमित्त लिकेच्या अग्निशामक विभागाला सज्जता लाभत असते.

सद्यस्थितीत शहरात ६ अग्निशमन केंद्रे आहे. तसेच अग्निशमन दलाकडे फायर मल्टीपर्पज टेंडर, वॉटर टेंडर, फायर टेंडर, मेगा बाउजर, ब्लड रेस्क्यू व्हेन, हजमेन्ट व्हॅन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म (३२ मिटर), बीए सेट व्हॅन, जलद प्रतिसाद व्हॅन उपलब्ध आहेत. पुढील वर्षात ४ नवीन बाउजर व दोन मल्टीपर्पज टेंडर अग्निशमन विभागात दाखल होतील. शहरामध्ये जुन्या वाड्यांची संख्या मोठी असून त्याबरोबर सिडको व सातपूरसारख्या ठिकाणी लहान घरे आहेत. येथील बेसमेंटमध्ये तसेच तळघरातील आग विझविण्यासाठी किंवा जवान वेण्यज्जवान धोक्याच्या ठिकाणी आग विझविण्यासाठी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी ६ कोटी ७६ लाख रुपये खर्च करून रिमोट कंट्रोल रोबोट खरेदी केले जाणार आहे

बांधकामविषयक नवीन नियमावलीतील तरतुदीनुसार शहरात ९० मीटर उंच इमारत बांधल्या जाणार असल्याने त्यासाठी तेवढ्याच उंचीची हायड्रोलिक शिडी खरेदीसाठी ३८.२७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू केली असून फेब्रुवारी २०२६ मध्ये अग्निशमन विभागात हायड्रोलिक शिडी दाखल होईल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---