नाशिक लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२५ । काही दिवसापूर्वी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात कक्षात आग लागल्याची घटना घडली होती. घटनेनंतर नाशिक शहरातील अनेक रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न निर्माण झाला होता. यातच सामाजिक कार्यकर्ते अजीज पठाण यांनी नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात माहितीचा अधिकार टाकत फायर ऑडिट बाबत माहिती मागविली होती. या माहिती अधिकारातून एक धक्कादायक बाब समोर आलीय.
ती म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या तब्बल २५० रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर महानगरपालिका प्रशासन देखील खळबळून जागे होऊन २५० रुग्णालयांना नोटिसा पाठवल्या आहे.
अर्थात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत गंभीरता आहे की नाही की नाशिक शहरात मोठी घटनांनंतर महापालिकेला जाग येईल असा प्रश्न आता सामान्य नागरिक उपस्थित केला जात आहे. एकूणच यासंदर्भात नाशिक महानगरपालिकेतील अग्निशामक आणि आपत्ती व्यवस्थापक राजेंद्र बैरागी यांची भेट घेतली असता त्यांनी या संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केली.
त्यामुळे नाशिक महापालिका शहरात असलेल्या रुग्णालयांचे आणि रुग्णांबाबत किती गंभीर आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तब्बल २५० पेक्षा जास्त खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे फायर ऑडिट होत नसेल, तर हा प्रश्न गंभीर असल्याचं देखील याचिकाकर्त्यांनी सांगितलं.