---Advertisement---

नाशिक मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.चव्हाणांच्या चौकशीचे आदेश ; नेमकं प्रकरण काय?

---Advertisement---

नाशिक : मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांच्या चौकशीचे आदेशदेखील आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी शहरातील गंगापूररोडवरील पंड्या रुग्णालयात गर्भलिंग निदान होत असल्याच्या संशयावरुन आरोग्य पथकाने धाड टाकत कारवाई केली होती. मात्र पुढे याप्रकरणी आरोग्य विभागाने हलगर्जी केल्याचा ठपका डॉ. चव्हाण यांच्यावर ठेवत त्यांच्यासह सहायक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांच्यावर कारवाईची मागणी लक्षवेधीद्वारे करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे या चौकशी करणार आहेत.

गंगापूररोड परिसरात डॉ. पंड्या रुग्णालय ३० वर्षापासून अनधिकृत असल्याचे बोलले गेले होते. गत ३० वर्षांपासून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणीच नसल्याची बाब समोर आली. महापालिकेने टाकलेल्या धाडीत रुग्णालयात अवैधरीत्या गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे १८ किट सापडले होते. विशेष म्हणजे रुग्णालयातील फ्रीज, कपाटाचे लॉकर यात अवैध गर्भपाताच्या गोळ्या आढळून आल्या आहेत तसेच या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या कोणत्याही नोंदी ठेवण्यात आलेल्या नाहीत.

१९९४ पासूनच्या गर्भपाताच्या नोंदी असल्या, तरी रुग्णांचे मात्र रेकॉर्डच नसल्याचे समोर आले आहे. सन १९९२-९३ पासून रुग्णालय सुरू आहे. याप्रकरणी डॉ. पंड्या यांच्यावर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर शहरातील अवैध गर्भपात केंद्राचा मुद्दा समोर आला होता. याप्रकरणी महापालिकेने हलगर्जीपणा केल्याचा आरोप लक्षवेधीत मांडण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---