---Advertisement---

नाशिककरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडातर्फे तब्बल ‘इतक्या’ घरांची लॉटरी

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकसारख्या शहरांमध्ये तुम्हाचेही स्वतःच्या मालकीचे घर असावं अशी इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिकमध्ये तुम्हाला आता स्वत:च्या मालकिचे घर घेता येणार आहे. म्हाडाच्या नाशिक मंडळाला २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या ५०२ घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२५ असून, ऑनलाईन तसेच ऑफलाईन अनामत रक्कम २१ मार्च २०२५ पर्यंत स्वीकारली जाणार आहे.

या ठिकाणी घर घेण्याची संधी
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या मखलाबाद शिवार, पाथर्डी शिवार, सातपूर शिवार, हिरावाडी, विहितगाव शिवार, तपोवन द्वारका, म्हसरूळ शिवार, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, देवळाली, नांदूर दसक आणि मौजे दसक येथे विविध गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आल्या आहेत. याअंतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकासाठी एकूण ५०२ सदनिकांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती आहे.

नाशिक मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत सहभागासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला ७ फेब्रुवारीला दुपारी अडीचपासून प्रारंभ झाला. सुधारित वेळापत्रकानुसार अर्जदारांना २० मार्च २०२५ रोजी रात्री १२ पर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी व सादर करता येईल. तसेच ऑफलाईन अनामत रक्कम २१ मार्च २०२५ पर्यंत स्वीकारली जाणार आहे. त्यामुळे आता १३ लाखांत नाशिककरांना स्वत:चं घर घेता येणार आहे.

तर, सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ९ एप्रिल २०२५ रोजी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे. मुख्य अधिकारी आवळकंठे म्हणतात, नाशिक मंडळाची ही सोडत २ घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण ३०० सदनिकांचा समावेश असून, अर्ज नोंदणीसाठी इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---