नाशिक लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२५ । राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. दरम्यान आज नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यातच हवामान खात्याने नाशिकसाठी महत्वाचा इशारा दिला आहे.
आज २ एप्रिल रोजी दुपारी ३.४५ वाजता नाशिक आणि अतिरिक्त क्षेत्रांच्या दक्षिणेकडे वेगळ्या ठिकाणी हवामान तीव्रतेचे वादळ आणि वादळाचे ढग IMD च्या नवीनतम रडार आणि उपग्रह निरीक्षणात दिसून आले आहेत. यामुळे नाशिक मधील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान गारपिटीची देखील शक्यता आहे.
यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. अवकाळी पाऊस झाल्यास रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्षे कांदाला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.