---Advertisement---

चांदीने गाठला नवीन विक्रम, सोनेही लाखाच्यावर ; नाशिक सराफ बाजारात आताचे दर काय?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ६ जून २०२५ । रशिया आणि युक्रेन यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला असून त्याचा परिणाम थेट बाजार पेठांवर दिसून येत आहे. चालू आठवड्यात पुन्हा सोन्याला झळाळी आल्याचे चित्र आहे. सोबतच चांदीही वाढताना दिसत आहे. दरम्यान गुरुवारी एकाच दिवसात नाशिक सराफ बाजारात सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा तोळा पुन्हा एक लाखाच्या वर गेला आहे. तर चांदीचा दर आतापर्यंतचा उच्चांकी दर गाठला आहे.

नाशिक सराफ बाजारात सोन्याचा दर ७२० रुपयांनी वाढला. यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा दर १००९४० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. तर चांदी दरात तब्बल ५४०० रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे आता चांदीचा दर १०८६६० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. चांदीचा दर हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी दर ठरला आहे.

दरम्यान, सततच्या दरवाढीमुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---