---Advertisement---

आनंदवार्ता ! सोने-चांदीचे दर घसरले : नाशिकमध्ये आता किती आहे भाव?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । एकीकडे देशात लग्नसराईचे दिवस सुरु असून मात्र यातच गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीने महागाईचा झेंडा लावला. या दरवाढीमुळे अनेक वधू-वर पित्यांचे बजेट कोलमडले होते. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूंच्या दरात घसरण झाल्याचे चित्र आहे. Nashik Gold Silver Rate today

सोन्याच्या दरात किंचित घसरण
मागील दोन आठवड्यांत सोने प्रति तोळा तब्बल 3000 रुपयांनी महागले होते. ही दरवाढ ग्राहकांसाठी चिंतेची बाब होती. पण या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 170 रुपयांनी घसरला. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 77,658 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 84,295 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीच्या दरातही घसरण
चांदीच्या दरातही मागील आठवड्यात चढ-उतार दिसून आले. चांदी 4 हजार रुपयांनी महाग होऊन पुन्हा 2 हजारांनी स्वस्त झाली होती. 24 जानेवारीला चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली. आता 27 जानेवारी रोजी पुन्हा चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 92,621 रुपये इतका आहे.

दरवाढीचा परिणाम
लग्नसराईच्या हंगामात ही दरवाढ वधू-वर पित्यांना चिंतेत टाकणारी ठरली होती. मात्र, आता दोन्ही धातूंच्या दरात झालेली घसरण ग्राहकांना थोडा दिलासा देणारी आहे. नाशिकमध्ये सोने आणि चांदीच्या दरात होणारी ही घसरण अनेक ग्राहकांसाठी सकारात्मक बदल आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---