नाशिक लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२५ । गेल्या आठवड्याच्या अखेरच्या काही दिवसात सोने दरात घसरण झाली होती. उच्चांकीपासून सोन्याचे दर खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता सोने दरातील घसरणीला ब्रेक लागला असून सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी दरवाढ झालीय. Gold Rate Today
Good returns वेबसाईटनुसार, आज गुरुवारी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 2,940 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या स्वस्ताईच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा चटका बसला आहे.सोन्यात एका दिवसातील सर्वात मोठी वाढ झालीय.
नाशिकमध्ये काय आहे आजचे भाव ?
या दरवाढीनंतर आता नाशिकच्या सराफ बाजारात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८५६३० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ९३४१० रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदी दरातही मोठी वाढ झालीय. आज चांदीचा दर प्रति किलो २ हजार रुपयांनी वाढून ९५००० रुपयावर पोहोचला आहे.
दरम्यान, अमेरिकेतील मॉर्निंगस्टारच्या विश्लेषकांनुसार पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमती 38% कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीत, भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 55 हजार रुपयांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र, आज सोन्याच्या दरात झालेली मोठी वाढ पाहता आणि जागतिक अस्थिरता लक्षात घेऊन सध्या मौल्यवान धातूच्या किमती 56,000 रुपयांपर्यंत कमी होतील, असा अंदाज लावणं कठीण आहे.