---Advertisement---

Gold Price : ग्राहकांसाठी आनंदवार्ता! नाशिक सराफ बाजारात सोने आणखी घसरले..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२५ । जागतिक ट्रेंडवर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांचा परिणाम नाशिकमधील सोन्याच्या किमतीवर होतो. या आठवड्याच्या सुरुवातीला नाशिक सराफ बाजारात सोने दरात मोठी उसळी दिसून आली. मात्र सलग तिसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. तुम्ही जर आज खरेदीला जात असाल तर त्यापूर्वी आताचे लेटेस्ट दर तपासून घ्या..

नाशिक सराफ बाजारात गेल्या तीन दिवसात सोने दरात प्रति तोळा ६०० ते ७०० रुपयांपर्यंतची घसरण झाली. यामुळे आज सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ८८७८० रुपये इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर १००४२० रूपये इतका आहे. दरम्यान, सोने दरातील ही घसरण बाजारातील करेक्शन असल्याचे जाणकार मानतात. येत्या पंधरवड्यात सोने दरात पुन्हा तेजी येऊ शकते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---