नाशिक लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२५ । जागतिक घडामोडींमुळे गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतली. एन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या किमती उच्चांकी पातळीवर जाणून पोहोचल्यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे डोळे पांढरे पडले. मात्र गेल्या आठवड्याच्या अखेरच्या नाशिकच्या सराफ बाजारात तीन दिवसात सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण झाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.
मागील तीन दिवसात सोन्याच्या किंमती २,७२० रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. सद्यस्थितीत सोने ९० हजार ६९० रुपयांवर स्थिरावले आहे. तर चांदीचा दर एक लाख रुपयांवरून ९३००० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. मात्र सध्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडींचा वेग बघता दर कमी होणार की वाढणार? ही धाकधुक कायम आहे.
उच्चांकीपासून सोने चांदी दरात मोठी घसरण?
काही दिवसापूर्वी सोन्याचा दर ९४ हजाररुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचले होते. तर चांदीचा दर १०५००० रुपयावर पोहोचला होता. मात्र उच्चांकीपासून सोनेदर ४ हजारापर्यंत घसरली. तर चांदी बारा हजारापर्यंत घसरली.
सोने दर 55 हजारांवर येणार?
अमेरिकेतील एका वित्तीय संस्थेनुसार पुढील काळात सोन्याच्या किंमती ३८ टक्क्यांनी घटून दर ५५ हजारांपर्यंत खाली येणार आहेत. गेल्या तीन दिवसात घटलेले सोने दर हे त्याचेच द्योतक असल्याचेही बोलले जात आहे. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धामुळे सोन्यात गुंतवणूकीचे प्रमाण वाढले असून, दर घसरल्यास गुंतवणूकदारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.