---Advertisement---

सोने चांदीचे भाव आवाक्याबाहेर! नाशिक सराफ बाजारात एकाच दिवसात मोठी वाढ

gold
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ३ जून २०२५ । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीचा भाव गगनाला भिडले आहे. सध्या सोने चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून दर कधी कमी होणार याकडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष लागले आहे. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी वाढ झालीय. त्यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव पुन्हा एक लाखाच्या वर गेला आहे.

रविवारी नाशिक सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ९८२०० रुपये प्रति तोळा इतका होता. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ९०८८० रुपये इतका होता. मात्र सोमवारी सोने दरात मोठी वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा दर २६४० रुपयांनी वाढून १००८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे

तसेच २२ कॅरेट सोने दरात १८९० रुपयाची वाढ होऊन प्रति तोळा ९२७७० रुपयावर पोहोचले आहे.दुसरीकडे चांदी दरात २०७० रुपयांची वाढ झाली असून यामुळे आता चांदीचा एक किलोचा भाव १०३५२० रुपयावर पोहोचला आहे.

मागील आठवड्यात सलग दोन दिवसांपासून होणाऱ्या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळालेला होता. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा हे भाव वाढले असल्याने ग्राहकांना पुन्हा जादा पैसे मोजावे लागणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि डॉलर किमतीत होणाऱ्या बदलाचा हा परिणाम असल्याचे जाणकार सांगत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---