नाशिक लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२५ । गेल्या काही दिवसापासून सोन्याचे (Gold Rate) दर तळपले आहे. तर, चांदीच्या(Silver Price) किंमतीत चढ-उताराचे सत्र सुरू आहे. सोन्याच्या किमतीने नवीन विक्रमी उच्चांक गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे डोळे मात्र पांढरे झाले. दरम्यान काल गुरुवारी पुन्हा एकदा उच्चांकी झेप घेतल्यानंतर आता आज शुक्रवारी नाशिकच्या सराफ बाजारात सोन्यासह चांदीचा भाव कमी झाल्याचे दिसून येत आहेत. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. Nashik Gold Silver Price Today
नाशिक सराफा बाजारात आज सोनं 700 रुपयांनी स्वस्त झालंय.नाशिक सराफा बाजारात सध्याच्या आठवड्यातील 4 दिवसांत सोन्याच्या दरांत तब्बल 1700 रुपयांची वाढ झाली होती. परंतु, शुक्रवारी सोनं 700 रुपयांनी स्वस्त झालंय. त्यामुळे आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 86 हजार 200 रुपये मोजावे लागणार आहेत.
चांदीचे दर देखील गेल्या काही दिवसांत प्रति किलो 1 लाखांवर गेले होते. आज चांदीच्या दरात देखील दीड हजार रुपयांची घट झाली असून आज प्रति किलो चांदासठी 97 हजार 500 रुपये मोजावे लागतील. गेल्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजार बंद होताना 86 हजार 200 रुपये तोळा असलेले सोने सोमवारी 500 रुपयांनी घसरून 85,700 वर स्थिरावले. तर मंगळवारी 400 रुपयांनी वाढले. त्यानंतर बुधवारी, शिवजयंतीला त्यात 1 हजारांची वाढ होऊन 87,100 रुपयांवर पोहोचले होते.