---Advertisement---

Gold Silver Price : सोन्याचे दर नव्या उच्चांकावर ; नाशिक सराफ बाजारात आताचे भाव किती? पहा..

gs (1)
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२५ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे देशांर्तगत बाजारात सोन्याच्या दर थांबण्याचे नाव घेत नसून दररोज नवनवीन रेकॉर्ड करत आहे. यातच बुधवारी नाशिकमधील सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळ्यात १०४० रुपयांनी वाढला, ही वाढ इतकी मोठी होती की सोन्याचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले. Gold Silver Rate

नाशिकमधील सोन्याचे आजचे भाव : Nashik Gold Rate
नाशिक सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा दर विना जीएसटी ७९,०५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ८६,२४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा दर ८७,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीचा एक किलोचा भाव ९७,५०० रुपयांवर पोहोचला आहे आणि जीएसटीसह ९९,९२० रुपयांवर गेला आहे.

दरवाढीचे कारण
सोन्याच्या दरात होणारी ही सततची वाढ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉलर सक्षम करण्यासाठी जाहिर केलेल्या परराष्ट्रीय धोरणांचा परिणाम आहे. विविध देश आपली अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत, ज्यामुळे पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढली आहे आणि सोन्याच्या दरात सतत मोठी वाढ होत आहे. जाणकारांचा अंदाज आहे की फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत सोने ८८,०००रुपयांचा (जीएसटीसह ९० हजार रुपयांचा) टप्पा गाठेल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---