---Advertisement---

ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना धक्का ; नाशिकमध्ये सोन्यात 1440 तर चांदीत 2060 रुपयाची वाढ

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । उद्या म्हणेजच ३० मार्च रोजी गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. लोकं या दिवशी सोनं खरेदी करण्याला अधिक महत्त्व देतात. मात्र ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना धक्का बसला आहे. कारण सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतली. सोबतच चांदी दरातही मोठी वाढ झाली. Nashik Gold Silver Price Today

शुक्रवारी (दि. २८) नाशिक सराफ बाजारात सोने दरात प्रति तोळा १४४० रुपयाची वाढ झाली. यामुळे सोन्याने ९२ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे शुक्रवारी चांदी दरात तब्बल २०६० रुपयाची वाढ झाली आहे.

आता काय आहे भाव?
या दरवाढीनंतर आज सकाळच्या सत्रात नाशिक सराफ बाजारात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८४, ७०० रुपयावर तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९२,०८० रुपायांवर पोहोचला आहे. सोबतच चांदीचा एक किलोचा दर १०५००० रुपये इतका आहे.

या आठवड्याच्या प्रारंभीच दरात घसरण नोंदविली गेल्याने, ग्राहकांमध्ये काही प्रमाणात उत्साहाचे वातावरण होते. सोमवारी (दि.२४) दरात १६० रुपयांची घसरण नोंदविली गेल्यानंतर, सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि.२५) ३३० रुपयांची सोने कमी झाले होते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरात आणखी घसरण होईल, अशी अपेक्षा ग्राहकांकडून वर्तविली जात होती. परंतु आठवड्याच्या अखेरच्या तीन दिवसांत सोने तब्बल १६९० रुपयांनी वधारले.

चांदी दरातील तेजी कायम असून, अवघ्या दोनच दिवसांत चांदी चार हजार शंभर रुपयांनी वधारली आहे. गेल्या बुधवारी (दि.२६) चांदीचे दर एक लाख नऊशे रुपयांनी घसरले होते. मात्र, मागील दोन दिवसांत पुन्हा एकदा चांदी दराने उसळी घेतल्याने, चांदी थेट एक लाख पाच हजारांवर गेली आहे. चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---