---Advertisement---

ग्राहकांसाठी गुडन्यूज! आज सोनं-चांदीचे दर घसरले, खरेदीला जाण्यापूर्वी वाचून घ्या नवीन दर

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२५ । सोने आणि चांदी दराने विक्रमी पातळी गाठल्याने ग्राहकांना घाम फुटला आहे. सोन्या चांदीचे दर कमी होणार कि नाही? यांची चिंता ग्राहकांना होती. मात्र आज सोनं आणि चांदीचे दर घसरले आहेत. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.

आज सोन्याचा दर ४९० रूपयांनी घसरला. यामळे आता २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी आपल्याला १,००,४८० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९२,१०० इतकी आहे. तर, १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ७५,३६० इतकी आहे. मात्र, चांदीचे दर १ लाखांवरच आहे.

सोन्याच्या दरात घसरण का झाली?

अमेरिकेने अलीकडेच जपान आणि फिलीपिन्ससोबत नवीन व्यापार करार केला आहे. यामुळे जागतिक बाजारात असलेला तणाव काहीसा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या (सोनं) ऐवजी धोकादायक पण अधिक नफा देणाऱ्या गुंतवणुकींकडे (शेअर बाजार) वळू लागले आहेत. या ‘प्रॉफिट बुकिंग’मुळे सोन्याची मागणी थोडी कमी झाली आणि किंमतीत घसरण झाली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---