---Advertisement---

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण ; नाशिकमधील आजचे भाव तपासून घ्या..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे ग्राहकही चिंतेत होते. पण आज ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. आज सोने आणि चांदी दरात घसरण दिसून आली.

आज २१ मार्च २०२५ रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. आज सोन्याचा दर २७० रुपयांनी तर चांदीचा दर ६२० रुपयांनी कमी झाला आहे. या घसरणीनंतर आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८८, ८६० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८१,४४६ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९९१ रुपये आहे, तर आज १ किलो चांदीचा दर ९९,०१० रुपये झाला आहे.

नाशिकमधील आजचे भाव?
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१, ३१८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ८८, ७१० रुपये आहे.

दरम्यान,वर्षभरातील मोठी दरवाढ लक्षात घेता यापुढेही सोन्याचे दर वाढत राहतील, या आशेवर बहुतेकांनी सोने मोडण्याचा मोह सध्यातरी टाळला आहे. त्यामुळे सोने मोडणाऱ्यांचे प्रमाण नगण्यच आहे. सोने, चांदी दरात अचानक वाढ झाल्याने काही अंशी खरेदीवर परिणाम नक्की झाला आहे. दरवाढीमुळे ग्राहकांचे गणित बिघडते. कारण त्यांचे गणित पैशांवर अवलंबून असते, वजनावर नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---