---Advertisement---

नाशिक सराफ बाजारात सोने-चांदीचा भाव पुन्हा वाढला; खरेदीपूर्वी तपासून घ्या भाव..

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२५ । मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांच्या आर्थिक परिणामांबद्दलची अनिश्चितता यामुळे सोन्याची ‘सुरक्षित गुंतवणूक’ प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे. यामुळे सोने आणि चांदीत दरवाढ सुरूच आहे. नाशिक सराफ बाजारात सोने चांदी दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. यामुळे आता सोने चांदी खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

एकीकडे लग्नसराईचे दिवस सुरु असताना त्यातच दोन्ही धातूंचे दर गगनाला भिडले आहे. नाशिक सराफ बाजारात सोने दरात १६० रुपयापर्यंतची वाढ झाली असून यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा दर ९१००० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर चांदी दरात १००० रुपयाची वाढ होऊन १०५००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

मार्च महिना सुरु झाल्यापासून सोन्याने आपला रंग दाखवलेला दिसत आहे. मागील दोन महिने सोनं भाव खाऊन गेल्यानंतर याही महिन्यात सोनं भाव खाताना दिसत आहे. १ मार्च रोजी नाशिकच्या सराफ बाजारात सोन्याचा दर ८८०१० रुपयावर होते.तर चांदीचा दर ९७८५० रुपयावर होता. गेल्या १८ दिवसात सोने दरात ३००० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. तर चांदी दर ७१५० रुपयांची वाढ दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---