नाशिक लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कारण मंगळवारच्या तुलनेत आज, बुधवारी सोनं स्वस्त झालं आहे. परंतु अजूनही सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकाजवळच आहे.
आंतराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या किमतीत दररोज नवनवीन विक्रम नोंदवत आहे. यामुळे एकीकडे दागिने खरेदी करणाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. आज सोने दरात घसरण झालीय.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर मंगळवारी 93,353 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. यात किंचित घट झाली आहे. आज बुधवारी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 93,102 रुपये (विनाजीएसटी) झाला आहे. सोने दर वाढीला अमेरिका आणि चीनमध्ये वाढत चाललेलं व्यापार युद्ध कारणीभूत ठरत आहे.
नाशिकमध्ये काय आहे आजचा सोने चांदीच भाव?
नाशिकमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,१८० प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ९६२०० रुपये आता इतका आहे. तर चांदीचा दर १ लाख रुपये इतका आहे.