नाशिक लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२५ । गेल्या अनेक दिवसांच्या मंदीनंतर, सोने आणि चांदी बाजारात पुन्हा हिरवळ पाहायला मिळत आहे. एकीकडे सणासुदीचे दिवस आता जवळ येत असताना दोन्ही धातूंचे दर वाढू लागल्याने ग्राहकांची चिंता वाढली. दरम्यान, नाशिकच्या सराफ बाजारात चांदी दराने इतिहास रचला आहे. एकाच दिवसात ३५०० रुपयाची वाढ झाली. तर सोनेही १००० रुपयांनी महागले आहे.
यामुळे सध्या नाशिकच्या सराफ बाजारात सोन्याचा दर १००७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ११४५०० रुपयावर पोहोचला आहे. हा सार्वधिक दर ठरला आहे.
MCX वर सोने आणि चांदीचे दर
MCX वर सोन्याची किमत ही 1168 रुपयांनी वाढलेली दिसली. MCX वर सोन्याचा ऑगस्ट वायदा 1168 रुपयांनी वाढून 97,859 रुपये झाली आहे. 10 ग्रॅमनुसार 22 कॅरेट सोन्याची किमत ही 91,400 रुपये आहे. तर 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोन्याची किमत ही 99,710 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किमत ही 650 रुपयांनी वाढलेली आहे. 24 कॅरेट सोन्याची किमत ही 710 रुपयांनी वाढली आहे. श्रावण महिना सुरु होताच अनेक सणसुदीला सुरुवात होत असते. सणासुदीला भारतात अनेक ठिकाणी दागिने खरेदी केले जातात त्यामुळे सोनं आणि चांदी महाग झालेलं पाहायला मिळते.