---Advertisement---

Nashik Gold Rate : नाशिक सराफ बाजारात सोन्याला पुन्हा विक्रमी झळाळी

gold
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने दरात मोठी वाढ झाली. दिवसेंदिवस सोने नवनवीन रेकॉर्ड बनवत असून यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. नाशिक सराफ बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून, नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर महिन्याभरातच सोन्याला पुन्हा विक्रमी झळाळी प्राप्त झाली आहे. Gold Silver Rate

जानेवारीत ७७ हजार ८०० रुपयांवर पोहोचलेल्या उच्चांकी दराने पुन्हा उसळी मारली असून, तो ८४ हजार ९०० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तर दरवाढ अशीच कायम राहिली तर गुंतवणूकदारांना पुढील पाच वर्षात ‘छप्परफाड रिटर्न’ची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

२०२० ते २०२५ या पाच वर्षातील दरवाढ पाहिली दर ती दुप्पट रिटर्न देणारी ठरली आहे. तर नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर महिन्याभरात शुद्ध सोन्याने ९ टक्क्यांनी मुसंडी मारली असून, गेल्या (३ ते ५ फेब्रुवारी) या तीन दिवसांत जवळपास २ हजार ५०० रुपयांनी सोन्याच्या दरावर वृद्धी झाली असल्याचे माहिती व्यावसायिकांनी दिली. या पाच वर्षात चांदीच्या दराने तर दुपटीपेक्षाही उच्चांक गाठला आहे. २०२० मध्ये चांदी प्रतिकिलो ४१ हजार रुपये होती. ती (फेब्रु, २०२५) ९७ हजार रुपये किलो झाली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---