---Advertisement---

ग्राहकांसाठी गुडन्यूज ! शस्त्रसंधीनंतर नाशिक सराफ बाजारात सोन्याच्या भाव 1800 रुपयांनी घसरला

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । सोन्याची (Gold) खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे सोन्याचा भाव पुन्हा उच्चांकीवर गेला होता. मात्र आता शस्त्रसंधी झाल्यानंतर सोने दरात मोठी घसरण दिसून आली. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

नाशिकच्या सराफ बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने स्वस्त झाले. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1650 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर 88,800 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1800 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 96,880 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून मोठी चढउतार दिसत आहे. आधीच सोनं लाखाच्या घरात गेल्यानं सोन्याच्या खरेदीबाबत साशंक असलेल्या ग्राहकांना आता भारत पाकिस्तानातील तणावामुळे पुन्हा वाट पाहण्याचीच वेळ आल्याचं चित्र आहे. गेल्या आठवड्यात 1लाख 500 रुपये प्रति तोळे असणारे सोन्याच्या दरात आता मोठी घसरण झालीय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---