---Advertisement---

ग्राहकांसाठी गुडन्यूज । सोने दरात मोठी घसरण, पहा नाशिकमधील आताचे भाव

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२५ । सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु आता या दरवाढीला ब्रेक लागला आहे. सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. सोबतच चांदी दरातही मोठी घसरण झाली.

आज शनिवारी 5 एप्रिलला सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत सोनं आज एक हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91 हजार रुपयांच्या पार गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 84 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. सोन्याच्या दरात घट झाल्यानंतरही गोल्ड या दिवसांत ऑल टाईम हाय रेकॉर्डवर आहे.

नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90690 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83130 रुपयांवर पोहोचले आहेत.

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत. 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---