---Advertisement---

Gold Rate : पाडव्याआधीच सोन्याने उभारली दरवाढीची गुढी ; नाशिकमधील आताचे भाव तपासून घ्या

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२५ । गुढीपाडवा सण अवघ्या काही दिवासावर आला आहे. गुढीपाडव्याला आपण साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त मानतो. या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करतात. जर तुम्हीही गुढीपाडव्याला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला झटका देणारी एक बातमी आहे. गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात सुरू असलेली वाढ आजही कायम पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात झालेल्या दरवाढीमुळे दागिने खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. Good returns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज २८ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात ११४० रुपयांची वाढ झाली आहे.

यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ९०,९८० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तसेच १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या दरात १०५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे हा दर ८२,३५० रुपयांवरुन ८३,४०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.

नाशिकमधील आजचे दर
२२ कॅरेट सोनं – ८३,४३० रुपये प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट सोनं – ९१,०१० रुपये प्रति १० ग्रॅम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---