नाशिक लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२५ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सतत चढ-उतार करत आहेत. आज होळीचा सण असून, अनेक लोक शुभ मुहूर्त साधून सोनं खरेदी करतात. होळीनिमित्त सराफा बाजारातून काहीशी दिलासादायक बातमी आहे. नाशिकमध्ये काहीसं सोनं स्वस्त झालंय. तर चांदीचे दर स्थिर आहेत.
आज नाशिक सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 200 रुपयांनी स्वस्त झालंय. त्यामुळे होळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणारांसाठी काहीसा दिलासा मिळणार आहे. या घसरणीनंतर आता नाशिक सराफ बाजारामध्ये आज 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 88 हजार 800 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 81 हजार 808 रुपयांवर आहे.
दुसरीकडे चांदीच्या दरात देखील गेल्या काही काळात मोठी वाढ झालीये. आज चांदीच्या भावात कोणतेही बदल झाले नसून चांदी प्रति किलो 98 हजार 600 रुपयांवर स्थिर आहे.