---Advertisement---

ग्राहकांनो पळा खरेदीला! सोन्याच्या दरात कमालीची घसरण, नाशिकमध्ये आताचा भाव काय?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । मागच्या काही दिवसापासून सोने दरात चढ उतार चालू आहे. कधी स्वस्त तर कधी महाग होताना दिसत आहे. दरम्यान यातच सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदवार्ता आहे. ती म्हणजे आज गुरुवारी सोने दरात मोठी घसरण झालीय.

गेल्या काही आठवड्यांपासून उच्चांकी पातळीवर असलेला सोन्याचा दर आता घसरणीच्या मार्गावर आहे. गेल्या 24 तासांमध्ये सोन्याचा भाव दोन हजार रुपयांहून अधिकने घसरला आहे. सध्या लग्नाचा सिझन सुरु असून अशा परिस्थितीत सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे याचा फायदा निश्चितच ग्राहकांना होईल.

नाशिकमधील २४ कॅरेट सोन्याचा दर
सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम २१३० रूपयांनी घसरून ९३,९३० रूपये झाला आहे. तर, १ ग्रॅम सोन्याचा दर २१३ रूपयांनी घसरून ९३९३ रूपये झाला आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर
२२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर तब्बल १९५० रूपयांनी घसरून ८६,१०० वर आला आहे. तर, २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा दर १९५ ने घसरून ८६१० रूपयांवर पोहोचला आहे. ही किंमत गेल्या काही दिवसांतील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

आजचा चांदीचा भाव
गुरूवारी चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज १०० ग्रॅम चांदीचा दर ९० रूपयांनी घसरून ९७०० रूपयांवर आला आहे. तर, १ किलो चांदीचा दर ९०० रूपयांनी घसरून ९७,००० रूपयांवर आला आहे. आज देशभरात १० ग्रॅम चांदीचा दर ९७० रूपये इतका आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि त्यापाठोपाठ भारत-पाक युद्धाच्या शक्यतेमुळे सर्वात सुरक्षित गुंतवणूक असलेल्या सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. 22 एप्रिलला सोन्याचा प्रतितोळा दर 1 लाख 2 हजार 73 रुपये इतके होता. या सर्वोच्च दरावरुन सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याचा प्रतितोळा दरात ७ ते ८ हजार रुपयांची घट झाली आहे. सध्याच्या काळ हा लग्नसराईचा असल्याने सोन्याच्या दरातील ही घसरण सामान्य वर्गाच्या पथ्थ्यावर पडणारी मानली जात आहे. आगामी काळात सोन्याचा भाव आणखी किती खालपर्यंत घसरणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागू राहिली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---