---Advertisement---

नाशिक सराफा बाजारात सोने नव्या उच्चांकावर ; आताचा 10 ग्रॅमचा भाव तपासून घ्या…

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । होळीचा सण संपला असला तरी सोन्याची धुळवड मात्र सुरूच आहे.एकच दिवसात सोने दरात मोठी झाल्याने देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतींनी विक्रमी उच्चांकावर उसळी घेतली.

ऐन लग्नसराईमध्येच सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सोमवारी नाशिक सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झालीये. तर चांदीने देखील नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत नवनवीन रेकॉर्डवर रेकॉर्ड करत असल्याने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिक सराफ बाजारात सोने दरात तब्बल १३०० रुपये प्रति तोळा वाढ झाली. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर 90,750 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचला. दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. चांदी प्रति किलो १,०२, ५०० रुपयांच्या सर्वोच्च दरावर पोहचल्या.

सोने दरवाढीचे कारण?
सध्या जगभरातील मध्यवर्ती बँका सर्वाधिक सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) सौमिल गांधी यांनी सांगितले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि आर्थिक धोरणांमुळे सोन्या-चांदीच्या बाजारात तेजी आलीये.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---