---Advertisement---

सावधान ! नाशिकच्या बहीण-भावाला सायबर ठगांनी लावला तब्बल १ कोटी २० लाखांचा चुना, अशी केली फसवणूक?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२५ । सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच नाशिकच्या एका महिला व्यावसायिकाच्या आणि तिच्या भावाला सोशल मीडियावर शेअर्स मार्केटच्या टिप्स घेणे चांगलेच महागात पडले. सायबर ठगांनी दोघांना तब्बल १ कोटी २० लाखांचा गंडा घातलाय. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि महिला व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, मोबाइलवर शेअर्स मार्केटशी संबंधित व्हॉट्स अॅप ग्रुपवर अॅड केले. या ग्रुपमध्ये शेअर्स मार्केटबाबत माहिती होती. ग्रुपमधील मोबाइलधारकांनी अंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमध्ये सध्या घसरण होत आहे. शेअर्सच्या किंमती खाली आल्याने गुंतवणूक केल्यास पुढे किमती कशा वाढतील याची माहिती दिली. काही अंतराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांच्या शेअर्सचे पोर्टफोलिओ दाखवत गुंतवणुकीच्या टिप्स दिल्या. अल्पावधीत कसा नफा मिळू शकतो, याची माहिती दिली. महिला व्यावसायिकाने शेअर्स मार्केट खाली आल्याने यात गुंतवणूक केल्यास नफा होईल, या उद्देशाने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली.

संशयितांनी तिला विविध कंपनीच्या शेअर्सची माहिती देत हे शेअर्कस खरेदी करण्याकरीता रक्कम जमा करण्यासाठी कंपनीच्या बँक खात्याचा नंबर दिला. महिलेने जानेवारी ते ८ एप्रिल या कालावधीत ७५ लाख ६८ हजारांचे ऑनलाइन विविध कंपनीचे शेअर्स खरेदी केले. संशयितांनी महिलेला मार्केट कसे वाढत आहे, याची माहिती दिली. महिलेने तिच्या भावालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला.

भावानेही ४४ लाख ८४ हजारांची गुंतवणूक केली. काही शेअर्सच्या किमंती वाढत असल्याने शेअर्स विक्री करण्यास सांगितले असता संशयितांनी आणखी पैसे गुंतवणूक करण्यास सांगत संपर्क तोडला. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---