नाशिक लाईव्ह न्यूज । ऑनलाईन सायबर ठगांकडून ( Online Fraud) विविध फंडे वापरत नागरिकांना गंडविले जात आहे. विशेष जास्त नफ्याचे आमिष देऊन नागरिक सायबर ठगांचे बळी ठरताना दिसत आहे. अशीच एक घटना नाशिकमधून समोर आलीय. ज्यामध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून भामट्यांनी नाशिक शहरातील (Nashik city) एका वृध्दास तब्बल ३६ लाखास गंडविले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली फसवणूक:
अरुण हरी शिंपी (७२ रा. गजानन दर्शन सोसा. पाथर्डी फाटा) यांच्याशी गेल्या वर्षी भामट्यांनी संपर्क साधला होता. यावेळी अल्पावधीच्या गुंतवणुकीतून जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखविण्यात आले.शिंपी यांचा विश्वास संपादन करीत भामट्यांनी काही रक्कम गुंतवणुक करण्यास भाग पाडले. यानंतर चार लाखाचा परतावाही त्यांनी केला मात्र नंतरच्या लाखोंच्या गुंतवणुकीतील रकमेचा अपहार केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून यात ३६ लाख रूपयांची फसवणुक करण्यात आली आहे. तगादा लावूनगी गुंतवणुक व नफा रक्कम पदरात न पडल्याने शिंपी यांनी पोलीसात धाव घेतली
अरुण हरी शिंपी यांच्या फिर्यादीवरून अलका गोरे (रा. बर्डेनगर, आडगाव नाका) व हिरामण भामरे (रा. समर्थनगर, इंदिरानगर) यांच्यावर फडवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.