नाशिक लाईव्ह न्यूज । ३० जून २०२५ । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी नाशिकमधील राजकीय समीकरण बदलताना दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपात प्रवेश घेतला. यांनतर आता माजी आमदार अपूर्व हिरे हे २ जुलैला भाजपात प्रवेश करणार आहे.
अपूर्व हिरे हे नाशिक शिक्षक मतदार संघाचे आमदार होते. २०१९ मध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सुधाकर बडगुजर यांना पक्ष प्रवेशाला विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी मात्र अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशाचं स्वागत केलं आहे.
माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश होणार आहे. डॉ. हिरे यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थकही भाजपमध्ये सामील होणार आहेत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी नाशिकमधील भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.गिरीश महाजन यांच्या रणनीतीमुळे हा प्रवेश शक्य झाल्याचे सांगितले जाते.
दरम्यान नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महापालिकेच्या 44 जागा आहेत. त्यापैकी शिवसेनेकडे 22 तर भाजपकडे 18 जागा आहेत. तर आरपीआयकडे 1, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 1 आणि मनसेकडे 2 नगरसेवक आहेत. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार आहे.